प्रयोग मालाड आयोजित

उपनगरातील जागरूक, पर्यावरणस्नेही, एकत्रित कुटुंब खासकरून मालाड, गोरेगाव आणि कांदिवली मधील
शालेय – महाविद्यालयीन विद्यार्थी, महिलावर्ग आणि कारागीर/कलाकार
यांच्यातील कला कौशल्यला वाव देणारी अभिनव स्पर्धा!!

टाकाऊतून टिकाऊ — देखणी कलाकृती निर्मिती स्पर्धा २०२६

स्पर्धेचा कालावधी → १ मे ते ३० जून, २०२६
पाहिली फेरी → १-१५ जुलै, २०२६
पारितोषिक वितरण समारंभ → १-१५ ऑगस्ट

भरघोस पारितोषिके, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान आणि कलाकृतीला शहर आणि राज्यात प्रसिद्धी देणारी स्पर्धा एकूण चार गटात संपन्न होणार!

(१) शालेय विद्यार्थी, (२) महाविद्यालयीन विद्यार्थी, (३) महिला वर्ग आणि (४) सर्व समावेशक खुला गट ज्यामध्ये कलाकार – तंत्रज्ञ् भाग घेऊ शकतात किंवा सर्व कुटुंब एक संघ /गट म्हणून सहभागी होऊ शकतात. मार्गदर्शनपर विडिओ, अटी नियम, आणि अर्ज थोड्याच अवधीत प्रसिद्ध होईल! प्रत्येक गटात फक्त चाळीस जणांना ‘ प्रथम येणाऱ्यास आग्रक्रम ‘ या न्यायाने संधी आहे. म्हणून इच्छुक स्पर्धसकांनी त्वरित नावं नोंदवावे.

अधिक माहितीसाठी
संवाद : 898-898-1919
WhatsApp9372031919
ई-मेल : [email protected]

हीं स्पर्धा आयोजित करण्यामागील संस्थेचा उद्देश

बेरोजगारी, महागाई वाढते आहे.
शिक्षण आणि आरोग्य यावरील खर्चही वाढतोय.
कधी अती पाऊस कधी महापूर तर कधी पाणी टंचाई आपण पाहत आलो आहोत.
पण मराठी माणूस आणि खास करून मुंबईकर हार मानत नाही, खचून जात नाही
संतांची शिकवण, आपले सण – उत्सव, सुधारकांचे मार्गदर्शन यामुळे आपण नेहमीच भविष्याची काळजी करत न बसता येणाऱ्या संकटाला सामोरे जातो, सतत कार्यरत राहतो.

पण ग्लोबल वॉर्मिग, पर्यावरणाची हानी, बदलते हवामान याचे तडाखे आपल्या दारे खिडक्या वर बसू लागले आहेत, याला सामोरे जाऊन ते थांबविण्यासाठी शासन-प्रशासन आणि जागतिक संघटना यांच्या सूचना-मार्गदर्शन व कार्यवाहीची वाट न पाहता आता आपणच सुरुवात केली पाहिजे.  या करिता घराघरातील विद्यार्थी, कुटुंब सदस्य आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रयोग मालाड संस्था आपल्या सहकार्याने  ” टाकाऊतून टिकाऊ देखणी कलाकृती निर्मिती स्पर्धा ” आयोजित करीत आहे.

या स्पर्धेमागील उद्देश सामाजिक – सांस्कृतिक तसेच वैश्विक आहे. महाराष्ट्रासह हिंदुस्थानभर हजारो वर्ष अधिराज्य गाजवित आहे ती शिल्पकला आणि चित्रकला आज कुठे आहे? गणेशोत्सव, नारत्रोत्सव आणि मोजक्याच  भव्य दिव्य नाट्य आणि चित्रपट निर्मिती मधून ती केव्हा तरी नेत्रसुख देते. बाकी?? 

अजिंठा वेरूळ लेणी, हेमाडपंथी मंदिरे, हंपी, खजुराहो, कोणार्क येथील भव्य प्रासाद आणि देवालये आणि कान्हेरी, इलिफान्टा या आणि आशा अन्य ठिकाणच्या प्राचीन गुंफा पाहिल्यावर आता आशा प्रकारची शिल्प आणि चित्र निर्माण का होत नाहीत हा प्रश्न जाणकार मंडळींना पडतो.

महान तज्ञ संशोधक स्टीफन हॉकिंग यांनी जगाला सावध करताना सुनावलं आहे, ‘ जर तुम्ही यंत्राच्या मागे लागून यांत्रिक बैधिकता  प्रगत करीत रहाल तर मानवजातीचा विनाश होईल ‘

हे लक्षात घेऊन अजून ” यंत्र विकास हे आपल भविष्य नाही  तर कलासंकृती जपणं,  तीच संवर्धन करण हेच आपल भूत – वर्तमान आणि भविष्य आहे ” असे आम्हाला वाटते , या करिता टाकावू सामनातून टिकाऊ कलाकृती निर्माण करण्यासाठी ,  स्थानिक होतकरू सुज्ञ विद्यार्थी, महिला, कलाकार  आणि कारागीर यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने हा स्पर्धा आयोजनाचा संकल्प सोडला आहे. 

आपले विविध सण, उत्सव, कुटुंबातील लग्न सोहळे, वाढदिवस अशा विविध क्षणी भक्ती, प्रेम, आदर, दाखविण्यासाठी जी सजावट करतो, भेट वस्तू देतो – घेतो यातील भावना संतुष्टी – समर्पण दाखविण्यासाठी तन – मन – धन वेचतो. पण यापलीकडे यातील ५०/६० टक्के  वेळ वस्तू- सहित्य यावर वाया जातो.

याच वाया जाणाऱ्या टाकाऊ सामनातून टिकाऊ शोभिवंत कलाकृती निर्माण करण्यासाठी स्थानिक विद्यार्थी आणि कारागीर/ कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आयोजित केली आहे. 

यातून मोजकेच  उत्तम विद्यार्थी आणि कारागीर/ कलाकार यांच्या कलाकृतीला पारितोषिक मिळेल पण प्रयत्न करणाऱ्या सर्व इतर स्पर्धकांचा संस्था आणि त्यांच्या परिवारात सन्मान होईलच. मुख्य म्हणजे आपला या स्पर्धेतील सहभाग हा इतर अनेकांना प्रेरणा देईल ज्यामुळे आपण पर्यावरण स्नेही वातावरण आपल्या सभोवती निर्माण करण्यासाठी उचलेले हे आपणा सर्वांचे पहिले,छोटे का होईना पण खंबीर पाऊल असेल.

या करिता आपला परिवार, मित्र मंडळी, कार्यालयीन/ उद्योगातील सहकाऱ्यांना याची माहिती देऊन या सामाजिक , शैक्षणिक हिताच्या पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावें ही विनंती.

स्पर्धेतील टाकाऊ वस्तू वापरण्याचे नियम व अटी

या स्पर्धेच्या स्पर्धाकांसाठी मार्गदर्शनपर व्हिडीओ लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
या स्पर्धेतील टाकाऊ वस्तू वापरण्याचे नियम व अटी

गट क्र. १  :- या स्पर्धकांनी शालेय टाकाऊ वस्तू ( वह्या पुस्तक, रद्दी पेपर, पेन, पेन्सिल, रबर, गम ट्युब, गम बॉटल, दप्तर, स्कुल ड्रेस, शूज लेस, सॉक्स, वॉटर बॉटल ई ई…) वापरणे आवश्यक
या वस्तूचे आकारमान (लांबी × रुंदी ×उंची प्रमाणे )
हीं टिकाऊ कलाकृती सर्वसाधारण पणे १२ × १२ × १२ इंच पर्यंत असावी.

गट क्र. २:- या महाविद्यालयीन स्पर्धकांनी वरील प्रमाणे साहित्य अधिक इलेक्ट्रॉनिक वेस्ट वापरावे ( मोबाईल, टॅब कव्हर, चार्जर, इलेक्ट्रिक वायर, स्क्रू ड्राइव्हर, रिमोट, बटण ई ई… )
हीं टिकाऊ कलाकृती सर्वसाधारण पणे १८ × १८ × १८ इंच पर्यंत असावी.

गट क्र. ३ :- या घरातील मुली- स्त्रिया (महिला वय वर्षे २१ आणि अधिक ) यांनी घरं कामातील टाकाऊ वस्तू ( कपडेलत्ते – साड्या, ड्रेस, चादरी, टिकाऊ किचन वेस्ट, प्लास्टिक / काचेच्या बरण्या – बाटल्या ई ई..)हीं टिकाऊ कलाकृती सर्वसाधारण पणे २ × २ × २ फूट पर्यंत असावी.

गट क्र. ४ :- या खुल्या गटातील स्पर्धेतील कुटुंबातील एकसंघ / गट, वरील तीनही गटातील टाकाऊ वस्तू एकत्रितपणे वापरून एक टिकाऊ देखणी कलाकृती बनवू शकतात.
तसेच खुल्या गटातील कलावंत, कारागीर, तंत्रज्ञ् टाकाऊ लाकूड सामान, लोखंड, अलुमिनिम, काचा, प्लास्टिक, सायकल, बाईक, कार यांचे स्पेअर पार्टस वापरून देखणी कलाकृती बनवू शकतात.
हीं टिकाऊ कलाकृती सर्वसाधारण पणे २.३० × २.३० × २.३० फूट पर्यंत असावी.

प्रवेश अर्ज, प्रवेश शुल्क, स्पर्धेतील सहभागाबाबत आणि स्पर्धेचे स्वरूप

⁠आम्ही ऑनलाईन दिलेल्या अर्जाचा प्रिंटाऊट घेऊन तो पूर्ण भरून स्वतःचें छायाचित्र लावून, त्या अर्जाचा फोटो काढून तो १५ एप्रिल ते १ मे दरम्यान आमच्या ईमेलवर पाठवायचा आहे. त्यावेळी सोबत दिलेल्या QR Code द्वारे प्रवेश शुल्क भरायचं आहे.

प्रवेश शुल्क :

  • ⁠गट १ → ५ ते १०वीचे  विद्यार्थी: ₹५०/-
  • गट २ → महाविद्यालयीन विद्यार्थी: ₹१००/-
  • गट ३ → २१ वर्षांवरील मुली/ गृहिणी: ₹२००/-
  • गट ४ → खुला वर्ग — पदवीधर, इंजिनियर, डॉक्टर, मेकॅनिक, सुतार, वेल्डर ई.पैकी कुणीही दोन व्यक्तींसह एक गट: ₹५००/- अथवा
  • एक संपूर्ण कुटुंब मिळून एक गट: ₹५००/-
    ( या कुटुंब गटाला शालेय – महाविद्यालयीन विदयार्थी आणि २१ वर्षावरील मुली / गृहिणी यांना वर निर्देशीत टाकाऊ सामान वापरणे बंधनकारक )

नियम:

  • ⁠प्रत्येक गटात कमीत कमी २०, जास्तीत जास्त ४० स्पर्धक अपेक्षित.कमी स्पर्धक आल्यास स्पर्धा रद्द करण्यात येईल.
  • ⁠अर्जात माहिती भरल्याप्रमाणे आपण जे साहित्य गोळा केले आहे त्याचा एक तपशीलासह २ ते ३ मी. व्हिडीओ, १० मे पर्यंत पाठविणे आवश्यक.
  • ⁠आपण कुटुंब किंवा मित्र परिवारातील कुणा एक दोन सदस्यांसह कलाकृती निर्मितीचे २ मी. ३/४ विडिओ ३१ मे पर्यन्त पाठविणे आवश्यक.
  • ⁠आणि अंतिम कलाकृतीवर स्वतः चें नावं आणि गटाचे स्टिकर लावून ३/४ मी. व्हिडीओ जो चारही अंगाने चित्रण करून, पूर्ण तपशील कथन करून १५ जून पर्यंत आमच्या मेल वर पाठवणे बंधनकारक आहे.
  • आपण पाठविलेल्या एकत्रित विडिओज मधून प्रत्येक गटातून १० कलाकृती १ ते १५ जुलै दरम्यान प्रथम फेरीत निवडल्या जातील. आशा सर्व ४० कलाकृतीना रूपये एक हजाराचा पुरस्कार दिला जाईल.
  • ⁠या विजेत्या कलाकृतीचे १-१५ ऑगस्ट दरम्यान दोन दिवस प्रदर्शन मांडले जाईल, याकरिता त्याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. याच काळात पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल तेंव्हा कुटुंब आणि मित्र परिवारासह आपण उपस्थित राहणे आवश्यक.

⁠पारितोषिक - पुरस्कार योजना

  • अंतिम स्पर्धेकरता प्रत्येक गटातून १० कलाकृती निवडणार त्यांना प्रत्येकी ₹१ हजार पुरस्कार
  • अशा ४० कलाकृतींचे २ दिवस प्रदर्शन. या काळात लोकांच्या पसंतीस उतरणाऱ्या प्रत्येक गटातील ३ आशा १२ कलाकृतींना  रू. दोन हजार उतेजनार्थ पारितोषिके देऊन सन्मान
  • इतर विद्यार्थी आणि कलाकारांना, काही हौशी कलाकारांना यातून रोजगार निर्मितीचे साधन उत्पन्न होण्यासाठी स्पर्धेतून प्रेरणा मिळावी या करता प्रत्येक गटातून पाहिल्या तीन येणाऱ्या कलाकृती मालाड मधील सुप्रसिद्ध शाळा, महाविद्यालय, रुग्णालय, महापालिका / बँक कार्यालय अथवा उद्योगसमूह, हॉल किंवा मोठ्या गृह संकुल / सोसायटीला ठराविक मूल्य घेऊन भेट देणार जेणे करून सदर कलाकृती ते त्यांच्या गेटवर/ प्रथम दर्शनी भागात प्रस्थापित करून आपल्या उद्देशाची जनजागृती करतील. ( प्रत्येक कलाकृतीवर कायम स्वरुपी संस्था, स्पर्धकांचे नाव छापले जाईल याची दक्षता घेतली जाईल.)

पारितोषिक तपाशील :-

गट ४. खुला गट (व्यावसायिक,कलाकार, तंत्रज्ञ्  अथवा कुटुंब सदस्य)

  1. ⁠प्रथम पारितोषिक — ₹२५ हजार
  2. द्वितीय पारितोषिक –₹१५ हजार
  3. तृतिय पारितोषिक — ₹१० हजार

गट क्र.३ (२१ वर्षांवरील मुली/ गृहिणी)

  1. प्रथम पारितोषिक — ₹२० हजार
  2. ⁠द्वितीय पारितोषिक –₹१२ हजार
  3. तृतिय पारितोषिक —  ₹८ हजार

गट २ (महाविद्यालयीन विद्यार्थी)

  1. ⁠प्रथम पारितोषिक — ₹१० हजार
  2. ⁠द्वितीय पारितोषिक –₹६ हजार
  3. तृतिय पारितोषिक — ₹३ हजार

गट क्र. १ (५ ते १० कक्षेतील शालेय विद्यार्थी)

  1. ⁠प्रथम पारितोषिक — ₹५ हजार
  2. ⁠द्वितीय पारितोषिक –₹४ हजार
  3. तृतिय पारितोषिक — ₹३ हजार

अत्यंत महत्वाचे :-

स्पर्धेचे आयोजनवेळा पत्रक, अटी नियम यात बदल अथवा स्पर्धा रद्द करण्याचे  सर्व हक्क संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या आधीन आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी हीं विंनती.