Online स्पर्धा एप्रिल २०२०

कोरोना व्हायरस (COVID–19) जीवाणूंच्या संसर्गाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना जीवाणूंच्या प्रादुर्भावाने श्रीमंत / गरीब, राजा / रंक असा भेदभाव न करता सगळ्याच स्तरावर आपली दहशत निर्माण केली आहे. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्यातरी सर्वांनी असेल तिथेच थांबणे हा एकमेव उपाय आहे, म्हणूनच आज संपूर्ण जग लॉकडाऊनचा उपाय अंगिकारताना दिसत आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील आपले विचार जाणून घेण्यासाठी खालील स्पर्धांचे online आयोजन करीत आहोत.

१. निबंध (लेख) लेखन स्पर्धा

विषय — कोरोना चा सामाजिक संदेश आणि देश व व्यक्ती स्तरावरील आर्थिक व्यवहारांवर होणारा परिणाम

२. छायाचित्र स्पर्धा

विषय — कोरोना हॉलिडे काळातील स्तब्ध मुंबईतील सार्वजनिक व नैसर्गिक विहंगम दृश्ये

३. पोस्टर बनवणे स्पर्धा

विषय — कोरोना युद्ध काळातील अपेक्षित मानसिकता


नियमावली – सर्व साधारण नियम

१. वरील तीनही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील.
२. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी निबंध, छायाचित्र किंवा पोस्टर प्रयोग मालाड ने दिलेल्या लिंकवरच अपलोड करावयाचे आहे. ई-मेल अथवा WhatsApp द्वारे अपलोड केले तर ग्राह्य धरले जाणार नाहीत.
३. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वयाची अट नाही.
४. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख २५ एप्रिल, २०२० असेल.
५. प्रत्येक स्पर्धेत प्रथम येणाऱ्या पहिल्या १०० प्रवेशिकाच स्वीकाराल्या जातील.
६. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाने स्वतःचे संपूर्ण नांव, पत्ता व भ्रमणध्वनी क्रमांक इत्यादीचा उल्लेख स्पर्धेच्या साहित्यावर न करता स्पर्धेच्या प्रवेशअर्जात स्वतंत्रपणे करावा. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाने स्वतंत्र अर्ज निबंध / छायाचित्र / पोस्टर सोबत सादर करावा. अन्यथा प्रवेश रद्द समजला जाईल.
७. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश शुल्क रुपये १००/- असेल व ते फक्त online स्वीकारले जाईल.
८. प्रत्येक विभागात कमीतकमी ३५ स्पर्धकांनी भाग घेतला तरच त्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.
९. एखादी स्पर्धा आयोजकांनी रद्ध केल्यास स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकाचे प्रवेश शुल्क परत करण्यात येईल. अन्य कोणत्याही कारणास्तव एकदा भरलेले शुल्क परत करण्यात येणार नाही.
१०. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.
११. आवश्यकतेनुसार स्पर्धेच्या कोणत्याही नियमात बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे असतील.

 

निबंध [लेख] लेखन स्पर्धा — नियमावली

१. निबंध (लेख) मराठी भाषेतच असावा.
२. वरील विषयावर आपले विचार १५० ते २५० शब्दात टाईप करून संस्थेने दिलेल्या लिंकवर अपलोड करावेत किंवा स्वहस्ताक्षरात लिहुन त्याचा फोटो अपलोड करावा.
३. एका व्यक्तीस एकच लेख स्पर्धेसाठी पाठवता येईल.

 

छायाचित्र स्पर्धा [फोटोग्राफी] – नियमावली

१. छायाचित्र रंगीत अथवा कृष्ण धवल (ब्लॅक अँड व्हाईट) असावे.
२. छायाचित्र मुंबईतील कोणत्या विभागाचे आहे, छायाचित्र काढण्याची तारीख व वेळ छायाचित्रासोबत कळविणे बंधनकारक आहे.
३. छायाचित्र संस्थेने दिलेल्या लिंकवरच अपलोड करावे.
४. संस्थेने मागितल्यास, परीक्षकांनी निवड केलेल्या छायाचित्राची A4 आकाराची एक प्रिंट स्वखर्चाने संस्थेच्या कार्यालयात पाठवावी लागेल.
५. एका व्यक्तीस एकच छायाचित्र स्पर्धेसाठी पाठवता येईल.

 

पोस्टर बनवणे स्पर्धा – नियमावली

१. पोस्टर रंगीत अथवा कृष्ण धवल (ब्लॅक अँड व्हाईट) असावे.
२. पोष्टर A3 आकाराच्या drawing पेपर वा तत्सम पेपरवर बनवून त्याचा फोटो संस्थेने दिलेल्या लिंकवरच अपलोड करावा.
३. पोस्टर ऑईल कलर, वॉटर कलर, ऍक्रॅलिक कलर, ऑईल पेस्टल, पेन्सिल कलर अथवा चारकोल यांचा उपयोग करून काढलेले असावे.
४. फक्त स्वत: रेखाटलेले पोस्टरच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. कोणाच्याही मार्गदर्शनाखाली किंवा कोणत्याही शिबिरात किंवा पूर्वी प्रसिध्द झालेले कोणतेही पोस्टर अथवा त्याचा कोणताही भाग किंवा स्पर्धकाशिवाय इतर कोणीही किंवा कोणत्याही तांत्रिक गोष्टीचे सहाय्य घेऊन रेखाटलेले पोस्टर ग्राह्य धरले जाणार नाही.
५. स्पर्धा घोषित करण्यापूर्वीच्या एक महिन्याच्या कालावधीत रेखाटलेले पोस्टरच स्पर्धेसाठी ग्राह्य धरलेले जाईल.
६. संस्थेने मागितल्यास, परीक्षकांनी निवड केलेल्या पोस्टरची ओरिजिनल कॉपी स्वखर्चाने संस्थेच्या कार्यालयात पाठवावी लागेल.
७. एका व्यक्तीस एकच पोस्टर स्पर्धेसाठी पाठवता येईल.

 

पारितोषिके

१. प्रत्येक स्पर्धेत खालीलप्रमाणे पारितोषिके देण्यात येतील.

 

प्रथम पारितोषिक – रुपये ५०००/-
द्वितीय पारितोषिक – रुपये ३०००/-
तृतीय पारितोषिक – रुपये २०००/-

२. प्रत्येक स्पर्धेत परीक्षकांनी निवडलेल्या प्रथम १५ स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक देण्यात येईल.
३. पारितोषिक वितरणाची तारीख नंतर कळवण्यात येईल.
४. पारितोषिक विजेत्या स्पर्धकांचे निबंध, छायाचित्र किंवा पोस्टर प्रयोग मालाडच्या वेबसाईटवर प्रसारित करण्यात येईल.
५. प्रयोग मालाड तर्फे निवडण्यात आलेल्या या स्पर्धेतील साहित्यकृतींचे प्रदर्शन शक्य झाल्यास, कोरोना व्हायरसचे संकट दूर झाल्यानंतर भरविण्यात येईल.

× Need help?