रामकृष्ण गाडगीळ समर्पित
प्रायोगिक नाट्य-पर्व
(पर्व-२)
सन १९७८ मध्ये स्थापन झालेल्या प्रयोग मालाड संस्थेने गेली ४७ वर्षे ज्ञान, सेवा, क्रीडा आणि कला ही उद्दिष्टे समोर ठेऊन मुंबई उपनगरात आपला ठसा उमटवला आहे.
प्रयोग मालाड संस्थेने एप्रिल ते जून २०२४ आणि जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाटय-पर्व या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले. या उपक्रमांतर्गत दर महिन्याला एक प्रायोगिक नाटक प्रयोग मालाड संस्थेतर्फे प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृह येथे दाखविण्यात आले. रंगभूमीवर सुरू असलेल्या मुंबई/पुणे येथील सर्वोत्तम १२ प्रायोगिक नाटकांची या नाटय पर्वासाठी निवड केली गेली. या नाट्य पर्वात नाटक सादर केलेल्या प्रायोगिक नाट्य संस्थांना निर्मिती खर्च सहाय्य आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रसिक प्रेक्षकांच्या आग्रहानुसार प्रयोग मालाड संस्थेतर्फे रामकृष्ण गाडगीळ समर्पित प्रायोगिक नाट्य पर्व या उपक्रमाचे “दुसरे पर्व” आयोजित केले जाणार आहे.
प्रयोग मालाड संस्था एप्रिल २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत प्रायोगिक नाटय-पर्व (पर्व-२) आयोजित करीत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या एका रविवारी दुपारी किंवा शनिवारी रात्री एक प्रायोगिक नाटक प्रयोग मालाड संस्थेतर्फे जयवंत दळवी लघुनाट्यगृह (चौथा मजला), प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली येथे दाखविण्यात येईल. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या मुंबई/पुणे येथील सर्वोत्तम प्रायोगिक नाटकांची या नाटय-पर्वासाठी निवड केली जाईल.
सभासदांना सर्व नाटकांसाठी एकत्र असणाऱ्या “वार्षिक सभासद ओळखपत्रा” चे वाटप करण्यात येईल. या सभासदत्त्वावर वार्षिक सभासद ओळखपत्र दाखवून कोणत्याही एका व्यक्तीस नाट्य पर्वासाठी प्रवेश मिळेल.
रामकृष्ण गाडगीळ प्रायोगिक नाटय-पर्व उपक्रमाचा शुभारंभ एप्रिल २०२६ मध्ये प्रथम प्रायोगिक नाटकाने होणार आहे.
आसन व्यवस्था:
- पहिली रांग: फक्त निमंत्रितांसाठी राखीव.
- दुसरी व तिसरी रांग: वरिष्ठ नागरिकांसाठी राखीव.
- उर्वरित रांगा: “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” या तत्त्वावर मिळतील.
