लेखक एक नाट्यछटा अनेक’ २०१४ – सादरीकारणासाठी निवडलेल्या २० एकांकिका

सादरीकरणासाठी निवडलेल्या २० एकांकिका

आत्मविभोर आत्ममग्नसामाजिकसामाजिक चळवळीनमध्ये काम करणारे दाम्पत्य. स्पर्धेच्या या समाजव्यवस्थेत मुलाकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचा बळी जाऊ नये म्हणून मूल होऊ न देण्याचा निश्चय. परंतु हा सगळा भ्याडपणा आहे असं मतपरिवर्तन झालेल्या स्त्रीमनाचा वेध घेणारी एकांकिका
एकरूप ते साले सगळेविनोदीबँक दरोड्यावरील एकांकिका
इथे ओशाळला शेक्सपिअरविनोदीराम व रावण यांनी स्वत:च्या नावाचा कंटाळा आल्यामुळे नावांची अदलाबदल केल्यावर झालेली धमाल. अखेर नावातच सर्व काही आहे अशी शेक्सपियरची कबुली
आम्ही लहान लहान मुलेभावनाप्रधाननिवृत्त शिक्षिकेच्या आठवणीतील बालवर्ग. त्यांचा साठावा वाढदिवस प्रौढ मूलं लहान होऊन साजरा करतात
बचेंगे तोसामाजिकगिरणी संपामुळे बेकार झालेल्या पण अजूनही लढा शेवटपर्यंत लढण्याची जिद्द असलेल्या, शिवाजी पार्क कट्ट्यावरील म्हाताऱ्यावरिल
भ्रम सारे फिटलेपौराणिक/ऐतिहासिकएका शूद्र वेश्येकडून धर्माविषयी झालेला भ्रम दूर करणारी एकांकिका
चटाटोविनोदीचटईला टाचणी टोचली या मंत्र सामर्थ्यावर जीवनात स्थिर होणाऱ्या तरुणावर
दिन जिव्हाळ्याचा क्षण साक्षात्काराचाकौटुंबिक / राजकीयएक चौकोनी कुटुंब. निरनिराळ्या राजकीय पक्षांची तत्व निष्ठेने स्वीकारणारे.घराबाहेरील दंगलीच्या निमित्ताने घरात एकत्र आल्यावर,तत्वांमधील भोंदूपणाचा साक्षात्कार झालेले कुटुंब यावरील एकांकिका
फुलपाखरू मरायलाच पाहिजेसामाजिकटाईमपास म्हणून मुलांशी मैत्री व त्यातून होणाऱ्या एकतर्फी प्रेमाचा दु:खद शेवट होणारी पण तरुणांची कैफियत मांडणारी एकांकिका
गोची शाकुंतलविनोदीशाकुंतलचे विडंबन
काटा रुते कुणाला / काटे उरलेकौटुंबिकपतीपत्नी व लहानपणापासून नियमितपणे गुलाबाचं फूल घेणारी पण आता सतरा वर्षाची झालेली शेजारची पमी या हळुवार नात्यावरील एकांकिका
माणसापेक्षा शेपटी बरीसामाजिकधर्मासाठी ज्या दगडाला देव मानला त्या दगडांनीच एकमेकांचा जीव घेणाऱ्या माणसापेक्षा उत्क्रांतीच्या टप्प्यावर शेपटीमुळे माकडच राहिल्याचं समाधान मानणाऱ्या माकाडांवरील एकांकिका
मेड फॉर इच अदरसस्पेन्सकुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता चेहरा बदलणाऱ्या एजन्सीची करामत
नको नको म्हणतानाविनोदी / fantasyनको म्हंटल की सर्व काही मिळतं या तत्वावर ( वैशिष्ट्य – शंकर विरुद्ध ब्रह्मदेव)
नाते तिसं दिसांचेकौटुंबिक३० दिवसाच्या करारावर आई-वडील पुरवणाऱ्या एजन्सीवरील एकांकिका
पुढल्या वर्षी येऊ नकाराजकीयमंगलमूर्तीचं विसर्जन करण्यापेक्षा समाजाला फसवणाऱ्या ढोंगी नेत्यांचं विसर्जन करा असा गणरायाचा संदेश देणारी
पुढेच जायचेराजकीयउभं आयुष्य कामगार चळवळीसाठी झोकून देणाऱ्या कॉम्रेड स्त्रीवरील
सवतेfantasy/ कौटुंबिकतसबिरीतील म्हातारी तिचा नवरा व प्रियकर (सवत्या) अशी धम्माल विनोदी. म्हातारी मेल्यावर नवऱ्याच्या सांत्वनासाठी आलेला सवत्या
तुझं  ते माझंकौटुंबिकसामान्य माणसाची प्रत्येक गोष्ट. अखेर अगदी मरणसुद्धा हिरावून घेणाऱ्या नियतीच्या न्यायावरील
त्या तिथे पलीकडेfantasyप्रत्येकाला वाटतं सुख पलिकडे आहे, पलिकडे गेल्यावर कळतं सुख अलीकडेच राहिले पण तेव्हा उशीर झालेला असतो समुद्र व मानव यांच्यातील संवाद रूपकात्मक व काव्यमय असलेली एकांकिका

Leave a Comment

× Need help?